Ashish Shelar : ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार - ॲड. आशिष शेलार

  45

मुंबई : विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे 'वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट' अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.


वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना घरांचे करारपत्रे यावेळी वितरित करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत आहे. गणपती उत्सवाच्या आधीच रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.



वांद्रे पूर्व येथील ३०.१६ एकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन उच्च न्यायालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वांद्रे पूर्व येथील ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या ७७ सदनिका व बालाजी शॉप किपर्स येथील ६७ सदनिका अशा एकूण १४४ सदनिका शासनाकडे पाठपुरावा करुन उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या सदनिका तयार होण्यास सहा ते नऊ महिन्याचा अवधी लागणार असल्याने १०० पात्र झोपडीधारकांने स्वखर्चाने पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची अट नमूद करुन पात्र झोपडीधारकांशी करारनामे करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

कार्यालयीन वेळेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होईल, मुंबईतील डबेवाल्यांकडून भीती व्यक्त

कांदिवली (वार्ताहर) : कार्यालयाच्या वेळेत बदल झाल्यास जेवणाच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास

कर्नाक पुलाचे नाव आता सिंदूर पूल, पुलाच्या नामकरणाचा मुहूर्त ठरला

मुंबई (खास प्रतिनिधी): मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला बोडणारा कर्नाक

राज्य सरकारच्या योजनांची माहिती, सेवा मिळणार एकाच पोर्टलवर

योजनांच्या अंमलबजावणीमधील एकसूत्रतेसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय मुंबई (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध

मला विचारल्याशिवाय... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना दिले हे स्पष्ट आदेश

मुंबई: राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यातच आज मीरारोड येथे मनसेकडून मोर्चा

"बेघर होऊ देणार नाही! : "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना ग्वाही

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले

Pratap Sarnaik: "मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी!" प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

मीरा-भाईंदर: मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे आज मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय