Sunday, July 6, 2025

Cid ACP Pradyuman : मोठी बातमी! 'सीआयडी' मध्ये होणार ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू?

Cid ACP Pradyuman : मोठी बातमी! 'सीआयडी' मध्ये होणार ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू?

अभिनेते शिवाजी साटम यांची एक्झिट!


मुंबई : सोनी टीव्हीवरील दीर्घकाळ चालणाऱ्या शो 'सीआयडी'मध्ये एसीपी प्रद्युम्नची प्रतिष्ठित भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आता या मालिकेला निरोप देण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आणि त्यांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणारी मालिका म्हणजे 'सीआयडी' (CID). सस्पेन्स-क्राईम असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० वर्ष मालिका चालली. २०१८ साली या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच मालिका सीझन २ सह पुन्हा सुरु झाली. आता यामध्ये एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांचाच मृत्यू दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नुकताच हा एपिसोड शूट करण्यात आला आहे.



अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना कायम एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं. त्यांना या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेत सीआयडीचे तेच प्रमुख दाखवण्यात आले आहेत. मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचं हे पात्र मरणार आहे. बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू होतो असा तो सीन दाखवण्यात येणार आहे. येत्या एपिसोडमध्ये बारबुसा (तिग्मांशू धुलिया) सीआयडी टीमला संपवण्यासाठी बॉम्ब लावतो. या घटनेत इतर सदस्य सुरक्षित राहतात पण एसीपी प्रद्युम्न यांचा दुर्देवी मृत्यू होतो. तिग्मांशू धुलिया मालिकेत कुख्यात गँगस्टर बारबोसाची भूमिका साकारत आहे.


दरम्यान, कलाकारांनी या एपिसोडचं नुकतंच शूटही केलं आहे. काही दिवसात हा एपिसोड प्रसारित होणार आहे. यापेक्षा अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही कारण हा चाहत्यांना मोठा धक्का मिळेल अशी मेकर्सची माहिती आहे.

Comments
Add Comment