नवी दिल्ली : संयुक्त संसदीय समितीने केलेल्या सूचना आणि सुचवलेल्या शिफारशी यांच्याआधारे केंद्र सरकारने वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत बुधवार २ एप्रिल रोजी सादर केला. या मसुद्याला लोकसभेची मंजुरी मिळाली. आता विधेयक राज्यसभेत सादर होणार आहे. राज्यसभेत विधेयकावर आज म्हणजेच गुरुवार ३ एप्रिल २०२५ रोजी चर्चा होणार आहे. चर्चेअंती मतदान होईल. विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.
Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी
नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. ...
लोकसभेत वक्फ विधेयक १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी मध्यरात्री मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली. आता विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत चर्चा होईल. चर्चेअंती मतदान होईल. विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.
काँग्रेस सरकारने दिल्लीतील १२५ मालमत्ता वक्फला दिल्या - अमित शाह
वक्फ बोर्डाने कोल्हापूर, बीड जिल्ह्यांतील मंदिरांच्या जमिनींवरील केला दावा - ...तर आज वक्फ विधेयकात बदल करण्याची वेळच आली नसती!
नवी दिल्ली : वक्फ ...
राज्यसभेत सत्ताधारी रालोआची स्थिती मजबूत आहे. भाजपासह रालोआतील प्रमुख पक्षांनी व्हिप बजावला आहे. यामुळे राज्यसभेत विधेयक मंजूर होणार हे निश्चित आहे.
राज्यसभेतील एकूण खासदार - २३६
रालोआचे एकूण खासदार - ११५
भाजपाचे खासदार - ९८
नामनिर्देशित खासदार - ६
नामनिर्देशित खासदार सरकारच्या बाजूने राहण्याची शक्यता गृहित धरल्यास रालोआचे एकूण खासदार - १२१