Sunday, April 20, 2025

उपयुक्तता

सद्गुरू वामनराव पै

जगात प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. तो निर्माण झाला याचा अर्थच तो उपयुक्त आहे. सफाई कामगार किती उपयुक्त? उद्या जर ठरवून ते आलेच नाहीत, त्यांनी कचरा नेलाच नाही, तर आपल्याला नाक धरण्याची वेळ येईल. घराबाहेर पडणे गैरसोयीचे होईल. हे कधी? जर सफाई कामगारांनी संप पुकारला तर. कारकुनांनी संप पुकारला तरी तेच, अधिकाऱ्यांनी संप पुकारला तरी तेच. डॉक्टरांनी संप पुकारला तर अवघा Chaos होईल. कारण ह्यांबरोबरच आपल्याला वकील, प्राध्यापक, सैनिक सगळेच पाहिजे. त्याचप्रमाणे भूतमात्रात कावळा, चिमणी, सर्प माणसांसकट सर्व प्राणी पक्षी जलचर पाहिजेत. हे सर्व मिळूनच पर्यावरण होते.

पर्यावरण म्हणजे काय? आपण सर्व जण एकमेकांवर अवलंबून आहोत. ही सर्वांनी एकमेकांवर अवलंबून राहण्याची जी व्यवस्था आहे तिलाच पर्यावरण असे म्हणतात. ही एक साखळी आहे. ह्या साखळीतील. एक जरी काडी निखळली तरी त्याचा सगळ्यावर दुरोगामी परिणाम होतो. उदाहरणार्थ गिधाडे आता लुप्त होत चाललेली आहेत. निसर्गात जेव्हा प्राणी जेव्हा मारतो तेव्हा ती घाण, कुजलेल्या अवशेषांना गिधाडे फस्त करतात. मात्र आता गिधाडांची संख्याच कमी झाल्यामुळे ती घाण पडून राहून त्यातून काहीसे रोग निर्माण होतात व हे रोग नंतर सर्वत्र पोहोचतात. हे असे आपण सर्व एकमेकांना जोडलेले आहोत व एकमेकांवर अवलंबून आहोत. केवळ माणसेच नव्हे तर निसर्गाचे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, पण आपल्याला हे कळत नाही.

पर्यावरण राखा असे जे सांगितले जाते, त्याचे कारण हे आहे. पर्यावरण राखणे म्हणजे फक्त वृक्ष जोपासणे असे नव्हे. वृक्ष जोपासणे, वृक्ष संवर्धन हे तर हवेच, पण त्याबरोबर इतर अनेक घटक आहेत. सर्व उपयुक्त आहे म्हणूनच “खल्विदं ब्रह्म” असे म्हटलेले आहे. ब्रह्माचा अर्थ मी वेगळा लावला. जगात जे जे निर्माण झाले आहे ते व ते सर्वच खऱोखर उपयुक्त आहे.
हे मी का सांगतो आहे. धर्म धर्म म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या धर्माची उपासना, जोपासना ही व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात मानवधर्म, म्हणजेच माणसाने माणसासारखे वागावे, राहावे, तसे संबंध एकमेकांशी ठेवावे ह्याचे सचोटीने वर्तनात आणले पाहिजे. जगात जे काही अयोग्य अनिष्ट चालू आहे ते थांबवायचे असेल तर ह्या मानवधर्माचे सर्वांकडून पालन हाच त्यावरचा उपाय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -