Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

बदलापुरात गाळ्याच्या भाड्याच्या वादातून पोटच्या मुलाने केली वडिलांची हत्या

बदलापुरात गाळ्याच्या भाड्याच्या वादातून पोटच्या मुलाने केली वडिलांची हत्या

बदलापूर : गाळ्याच्या भाड्याच्या वादातून पोटच्या मुलाने वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सदर धक्कादायक घटना बदलापुरात सकाळी आठच्या सुमारास घडली. अनंत कराळे असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव गणेश कराळे असे आहे.गाळ्याच्या भाड्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये असलेल्या वादातून हा प्रकार झाला असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांनी दिली.


या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेलवली भागात राहणारे अनंत कराळे यांचे या भागात दोन गाळे आहेत. या गाळ्यांपैकी एकाचे भाडे वडिलांनी आणि दुसऱ्याचे भाडे मुलाने घ्यावे असे ठरले होते. मात्र वडील दोन्ही गाळ्यांचे भाडे घेण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यातून गेल्या सात आठ वर्षांपासून अनंत कराळे व त्यांचा मुलगा गणेश यांच्यात वाद होत होते.



बुधवारी सकाळी अनंत कराळे व त्यांचा मुलगा गणेश बेलवली येथील दुकानाच्या गाळ्यात आले.त्यावेळी पुन्हा त्यांच्यात यावरून वाद झाला.आणि गणेशने अनंत कराळे यांच्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली.


दरम्यान,याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश कराळे याला अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment