Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव लोकसभेत सादर केला. विरोधकांच्या बाजूने आठ खासदारांनी या विषयावर त्यांची मते मांडली. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना अमित शाह यांनी उत्तर दिले. लोकसभेत ४० मिनिटांच्या चर्चेअंती मतदान झाले. आवाजी मतदानाने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाला.



लोकसभेत मणिपूर संदर्भात चर्चा सुरू होती त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा हे दोन प्रमुख खासदार तसेच अनेक विरोधक अनुपस्थित होते. एरवी सरकारने मणिपूरवर चर्चा करावी अशी आग्रही मागणी करणारे अनेक खासदार चर्चेवेळी अनुपस्थित होते. लोकसभेत वक्फ विधेयकावर मतदान झाल्यानंतर लगेच मणिपूरवर चर्चा होणार असल्याचे सर्व खासदारांना आधीच सांगण्यात आले होते. हा कार्यक्रम महिती असूनही अनेक विरोधी खासदारांनी चर्चेवेळी गैरहजर राहणे पसंत केले.

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण मणिपूरमध्ये कायदा - सुव्यवस्था आणि शांतता नांदावी ही काँग्रेसची अपेक्षा आहे. यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात काम व्हायला हवे, जे मागील काही वर्षात झालेले नाही; असे काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले. त्यांनीच विरोधकांच्यावतीने चर्चेला सुरुवात केली. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव तयार केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असेही थरुर म्हणाले. पंतप्रधान मोदींनी एकदा मणिपूरचा दौरा करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

मणिपूरमध्ये सरकारी शस्त्रागारातून साठ हजार शस्त्रे आणि सहा लाखांपेक्षा जास्त दारुगोळा लुटण्यात आला. राज्याच्या आर्थिक विकासाला धक्का बसला. राज्यात फक्त राष्ट्रपती राजवट लावून प्रश्न सुटणार नाही, केंद्र सरकारलाच ठोस पावलं उचलावी लागतील; असेही शशी थरुर म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून कायदा - सुव्यवस्था नियंत्रणात आहे. मागील दोन महिन्यांपासून वटहुकुमाच्याआधारे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे. सुरक्षा पथकांनी राज्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. जनतेचे सुरक्षा पथकांना सहकार्य लाभले आहे; यामुळे मणिपूरमधील प्रश्न लवकरच सुटतील असा विश्वास अमित शाह यांनी व्यत्त केला.

मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे राज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण जेव्हा आमची सत्ता दोन्हीकडे नव्हती तेव्हाही हा संघर्ष होता. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मणिपूरमध्ये गेले नव्हते, ही बाब नोंदवून अमित शाह यांनी केंद्र सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलल्याचे सांगितले. वांशिक संघर्शाशी सबंधित सर्व गटांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला. यानंतर मणिपूरमध्ये विधानसभा विसर्जित न करता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली तर दोन महिन्यांच्या आत या निर्णयाला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. या तरतुदीला लक्षात ठेवून केंद्र सरकारने गुरुवार ३ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजता राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करुन घेतला.
Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला