मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या(Team India) २०२५ मध्ये भारतात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले (bcci). भारत या हंगामात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ कसोटी सामने, ३ एकदिवसीय आणि ५ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे.
भारतातील हंगामाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२५ रोजी अहमदाबादमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेने होईल. मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी १० ऑक्टोबरपासून कोलकाता येथे होणार आहे.
IPL 2025: ७ सामने ४४४ धावा, ४ अर्धशतके आणि १ शतक…८.५ कोटींच्या साई सुदर्शनचा जलवा
वेस्ट इंडिज मालिकेनंतर, भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये रोमांचक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत सुरू होईल, तर यातील दुसरा सामना ऐतिहासिक असेल, कारण गुवाहाटी येथे हा सामना होणार आहे. गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होईल. हा सामना बारसपरा स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळतील, अंतिम सामना अहमदाबादमध्ये होईल.
असं असेल भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका
पहिली कसोटी: २ ते ६ ऑक्टोबर २०२५, अहमदाबाद
दुसरी कसोटी: १० ते १४ ऑक्टोबर २०२५, कोलकाता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका
पहिली कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर २०२५, नवी दिल्ली
दुसरी कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर २०२५, गुवाहाटी
पहिला एकदिवसीय सामना: ३० नोव्हेंबर २०२५, रांची
दुसरा एकदिवसीय सामना: ३ डिसेंबर २०२५, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना: ६ डिसेंबर २०२५, विशाखापट्टणम
पहिला टी-20 सामना: ९ डिसेंबर २०२५, कटक
दुसरा टी-20 सामना: ११ डिसेंबर २०२५, नवी चंदीगड
तिसरा टी-20 सामना: १४ डिसेंबर २०२५, धर्मशाला
चौथा टी-20 सामना: १७ डिसेंबर २०२५, लखनऊ
पाचवा टी-20 सामना: १९ डिसेंबर २०२५, अहमदाबाद