Thursday, October 30, 2025
Happy Diwali

भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या

भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या

मुंबई : मेट्रो ३ ही देशातील १०० टक्के व राज्यातील सर्वाधिक लांबीची मेट्रो मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर ते वांद्रे कुर्ला संकूल (बीकेसी) असा दहा स्थानकांचा आणि १२.९९ किमी लांबीचा आहे. त्याचेच उद्द्घाटन पंतप्रधानांनी ५ ऑक्टोबर २०२४ ला केले होते. या टप्प्यात सीप्झ, एमआयडीसी, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल यांचा समावेश आहे. तसे असतानाही मार्गिकेवर प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा नाममात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात सुरू झालेल्या बहुचर्चित भूमिगत मेट्रोच्या गाड्या आरे कारशेडमध्ये धूळखात उभ्या असल्याचे चित्र आहे. अत्यल्प प्रवासी संख्येमुळे मयादित गाड्यांचाच वापर होत असल्याने उर्वरित गाडया तशाच उभ्या आहेत.

मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दररोज दोन लाख प्रवाशांची ये-जा असेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सध्या मार्गिकेवरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या जेमतेम २० हजारांच्या घरात आहे. त्यामुळेच सर्व गाड्यांचा वापर होत नसल्याची स्थिती आहे. पहिल्या टप्प्यासाठी मागवण्यात आलेल्या एकूण नऊ गाड्यांपैकी अवघ्या तीन गाड्या वापरात आहेत. त्यातही दोनच गाड्या दररोज प्रत्यक्ष सेवेत आहेत.

तिसरी गाडी' स्टँडबाय' असते. मात्र परिणामी सहा गाड्या आरे येथील कारशेडमध्ये तशाच धूळखात उभ्या असल्याचे आरे जेव्हीएलआर स्थानकावार गेल्यानंतर स्पष्ट दिसून येत आहे. ही मार्गिका केंद्र आणि राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) या संयुक्त कंपनीकडून चालवली जाते. नेमक्या किती गाड्या दररोज चालवल्या जातात, याबाबत विचारले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment