
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या विविध मॉडेलसाठी येणारा खर्च तसेच ऑपरेशनल खर्चामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणे गरजेचे झाले. इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किंमतीमुळे ही वाढ केल्याचे सांगितले जात आहे.
किती वाढणार किंमत?
मारुती सुझुकीच्या माहितीनुसार, किंमतीमधील वाढ ही विविध मॉडेलवर अवलंबून असणार आहे. कंपनीची प्रसिद्ध एसयूव्ही ग्रँड व्हिटाराच्या किंमतीत ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ होईल. तर कंपनीची स्वस्त व्हॅन मारुती इकोमध्ये २२ ५०० रूपयांची वाढ होईल. मारूतीच्या वॅगन आरच्या किंमतीत १४ हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाईल. याशिवाय मल्टी पर्पज व्हेईकल एक्सएल६ आणि अर्टिगा यांच्या किंमती १२५०० रूपयांपर्यंत वाढतील.
भारतीयांची आवडती कार Wagon R…
गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर देशातील सर्वाधिक विक्रीची कार ठरली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात या कारच्या १,९८,४५१ युनिटची विक्री केली. कंपनीचा दावा आहे की गेल्या चार आर्थिक वर्षांपासून ही कार सातत्याने बेस्ट सेलिंग कार ठरत आहे.