मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. दौंड – अजमेर – दौंड साप्ताहिक विशेष गाडी दौंड ते अजमेर विशेष, गाडी १० एप्रिलपासून २६ जूनपर्यंत धावेल. अजमेर ते दौंड विशेष ही २८ मार्चपर्यंत चालवण्यात येणार होती ती आता ११ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल.
Thane News : घोडबंदर रोड, फाऊंटन जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार!
सोलापूर – अजमेर – सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत धावणार आहे. अजमेर ते सोलापूर विशेष गाडी ६ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावेल. साई नगर शिर्डी – बीकानेर – साई नगर साप्ताहिक शिर्डी विशेष गाडी १३ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत धावेल. बीकानेर ते साई नगर शिर्डी विशेष, १२ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावेल. दादर – भुसावळ – दादर विशेष – गाडी आता ३० जूनपर्यंत धावेल. भुसावळ ते दादर विशेष,गाडी आता ४ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल. दादर ते भुसावळ विशेष गाडी ४ मेपासून २७ जूनपर्यंत धावेल.
पुढील अनारक्षित विशेष रेल्वे सेवांचा विस्तार ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे.
- गाडी क्रमांक ०७३०१ बेळगावि ते मिरज
- गाडी क्रमांक ०७३०२ मिरज ते बेळगावी
- गाडी क्रमांक ०७३०३ बेळगावी ते मिरज
- गाडी क्रमांक ०७३०४ मिरज ते बेळगावी
या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.