Thursday, April 3, 2025
Homeताज्या घडामोडीअंबरनाथमध्ये मनसेचा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दणका

अंबरनाथमध्ये मनसेचा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दणका

अमराठी बँक मॅनेजरला दिला इशारा

अंबरनाथ : अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गोंधळ घातला. बँकेचे अमराठी बँक मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरे दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. यावेळी मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा मनसैनिकांनी मॅनेजरला दिला.

Metro : अखेर मेट्रोच्या श्यामनगर स्टेशनचा प्रश्न सुटला!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत, बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही, याची पाहणी मनसैनिकांनी करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.तसेच रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आदी पदाधिकारी गेले होते.

दरम्यान मनसेचे पदाधिकारी बँकेत गेले असताना अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापकाकडे पत्र देण्यासाठी गेले होते. यावेळी बँकेचे शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितले. यावरून मनसेचे पदाधिकारी अधिक आक्रमक होऊन मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताच या ब्रँच मॅनेजरने आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असे उत्तर दिले. यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचा अधिक संताप झाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसेच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -