Thursday, April 3, 2025
Homeताज्या घडामोडीBMC : बीएमसीच्या वतीने ६ हजार १९८ कोटी रुपये मालमत्ता कर संकलित

BMC : बीएमसीच्या वतीने ६ हजार १९८ कोटी रुपये मालमत्ता कर संकलित

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ६ हजार २०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले आहे. तसेच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात अधिकचे १७८ कोटी ३९ लाख रुपये देखील यंदा संकलित करण्यात आले आहेत.

मुंबईकर नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवासुविधा दिल्या जातात. उत्तमोत्तम नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यासाठी विविध आर्थिक स्रोत महत्वपूर्ण ठरत असतात. मालमत्ता करही याच आर्थिक स्रोतांपैकी अत्यंत महत्वपूर्ण स्रोत मानला जातो.

या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर संकलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर मालमत्ता करभरणा करावा, यासाठी जनजागृती करणे; निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र ठेवणे; करभरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देणे; मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करणे तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करणे, आदी प्रयत्नांचा यामध्ये समावेश होता.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिनांक २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या निर्धारित कालावधीदरम्यान ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित करण्यात आले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.

प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता, दिनांक २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षामध्ये जी दक्षिण (६२४ कोटी ५० लाख रुपये), के पूर्व (५६८ कोटी ५६ लाख रुपये), एच पूर्व (५२६ कोटी ६४ लाख रुपये), के पश्चिम (५०५ कोटी रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रशासकीय विभागनिहाय संकलित मालमत्ता-

शहर विभाग –

१) ए विभाग – २१९ कोटी १२ लाख रुपये

२) बी विभाग – ३६ कोटी ३३ लाख रुपये

३) सी विभाग – ८७ कोटी ८३ लाख रुपये

४) डी विभाग – २७३ कोटी ४६ लाख रुपये

५) ई विभाग – १५४ कोटी १६ लाख रुपये

६) एफ दक्षिण विभाग – १३५ कोटी २५ लाख रुपये

७) एफ उत्तर विभाग – १६३ कोटी २२ लाख रुपये

८) जी दक्षिण विभाग – ६२४ कोटी ५० लाख रुपये

९) जी उत्तर विभाग – २३९ कोटी ४० लाख रुपये

एकूण संकलित कर रक्कम – १ हजार ९३३ कोटी २६ लाख रुपये

पश्चिम उपनगरे –

१) एच पूर्व विभाग – ५२६ कोटी ६४ लाख रुपये

२) एच पश्चिम विभाग – ३८२ कोटी ७४ लाख रुपये

३) के पूर्व विभाग – ५६८ कोटी ५६ लाख रुपये

४) के पश्चिम विभाग – ५०५ कोटी रुपये

५) पी दक्षिण विभाग – ३६३ कोटी ८७ लाख रुपये

६) पी उत्तर विभाग – २१४ कोटी ५६ लाख रुपये

७) आर दक्षिण विभाग – १७९ कोटी ३६ लाख रुपये

८) आर मध्य विभाग – २२२ कोटी १० लाख रुपये

९) आर उत्तर विभाग – ७५ कोटी ६५ लाख रुपये

एकूण संकलित कर रक्कम – ३ हजार ०३८ कोटी ४९ लाख रुपये

पूर्व उपनगरे –

१) एल विभाग – २६० कोटी ६२ लाख रुपये

२) एम पूर्व विभाग – ८८ कोटी ४९ लाख रुपये

३) एम पश्चिम विभाग – १४५ कोटी ४० लाख रुपये

४) एन विभाग – २१९ कोटी ३७ लाख रुपये

५) एस विभाग – ३३० कोटी ८० लाख रुपये

६) टी विभाग – १७४ कोटी १२ लाख रुपये

एकूण संकलित कर रक्कम – १ हजार २१८ कोटी ७९ लाख रुपये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -