पालघर : प्रादेशिक भाषा ही बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र सरकार आणि आरबीआयचा नियम आहे. परंतू बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे काम सुरू आहे. या निषेधार्थ मनसेकडून पालघरमधील बँकांच्या सर्व व्यवहारात, दैनंदिन सेवा, मराठी भाषेत उपलब्ध करण्यात यावे. तसेच मराठी भाषेचा अवमान होणार नाही याबाबतचे निवेदन देण्यात आले.
बँकांनी मराठी भाषेचा वापर न केल्यास “मनसे स्टाईल” आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष रुपेश म्हात्रे, पालघर तालुका अध्यक्ष संदीप किणी, महिला तालुका अध्यक्ष जाई किणी, माजी शहर अध्यक्ष पालघर सुनिल राऊत, तसेच हिमांशू राऊत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.