Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

बुलढाण्यामध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

बुलढाण्यामध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू
बुलढाणा:  बुलढाणा जिल्ह्यात खासगी बस, बोलेरो आणि एसटी बस या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.  शेगाव-खामगाव महामार्गावर झालेल्या या अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पहाटे साडे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव वेगात असलेली बोलेरो कार एसटी बसवर धडकली.  यानंतर पाठीमागून येत असलेल्या खाजगी प्रवासी बसने या अपघातग्रस्त गाड्यांना धडक दिली. 

या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर २४ जण यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांवर खामगाव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वेगात असलेली बोलेरो शेगाव येथून कोल्हापुरच्या दिशेने जात होती.  तर एसटी महामंडळाची बस पुणे येथून परतवाडाच्या दिशेने जात होती. या दोन वाहनांची धडक झाली. त्यातच एक खाजगी बस या दोन गाड्यांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की ५ जण यात मृत्यूमुखी पडले तर २४ जण जखमी झालेत. 
Comments
Add Comment