Saturday, May 17, 2025

देशताज्या घडामोडीक्राईम

Bajinder Singh : ‘येशू येशू प्रॉफेट’ बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

Bajinder Singh : ‘येशू येशू प्रॉफेट’ बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

मोहाली : २०१८ मधील बलात्कार प्रकरणात पंजाबमधील स्वतःला ख्रिश्चन पाद्री म्हणवणाऱ्या बजिंदर सिंगला (Bajinder Singh) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगळवारी मोहाली येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रांत कुमार यांनी हा निर्णय दिला.


बजिंदर सिंग, ज्याला ‘येशू येशू प्रॉफेट’ म्हणूनही ओळखले जाते, झीरकपूर येथील महिलेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरला. न्यायालयाने २८ मार्च रोजी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (जानबूझकर दुखापत करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत त्याला दोषी ठरवले.



पाटियाला तुरुंगात तातडीने रवानगी


विशेष न्यायालयाने बजिंदर सिंगला कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत शिक्षा सुनावली, त्यानंतर त्याला तात्काळ न्यायालयीन कोठडीत घेत पाटियाला तुरुंगात पाठवण्यात आले.



इतर आरोपी निर्दोष मुक्त


या प्रकरणातील इतर सहआरोपी अकबर भट्टी, राजेश चौधरी, जतिंदर कुमार, सितार अली आणि संदीप ऊर्फ पहलवान यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. तसेच सुखा सिंग या आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.



बजिंदर सिंगविरोधात FIR कशी दाखल झाली?


पीडितेच्या तक्रारीवरून झीरकपूर पोलिसांनी बजिंदर सिंग आणि सहा आरोपींविरोधात IPC कलम ३७६, ४२० (फसवणूक), ३५४ (विनयभंगाचा प्रयत्न), २९४, ३२३, ५०६, १४८ आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.



काय आहे प्रकरण?



  • पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे की, ती पहिल्यांदा बजिंदर सिंगला एका हॉटेलमध्ये भेटली होती. त्यानंतर ती त्याच्या प्रार्थना सभांना जाऊ लागली. बजिंदर सिंगने तिची वैयक्तिक माहिती मिळवून हळूहळू तिच्यावर प्रभाव टाकला.

  • सप्टेंबर २०१७ मध्ये बजिंदर सिंगने तिला झीरकपूरमधील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिचा पासपोर्ट आणण्यास सांगितले.

  • त्यानंतर तो तिला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला आणि सांगितले की तो लवकरच यूकेला जाणार आहे व तिलाही घेऊन जाईल.

  • त्याच बहाण्याने त्याने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला बेशुद्ध करून अश्लील व्हिडिओ तयार केला.

  • पुढे तो परदेशात पाठवण्याच्या नावाखाली मोठी रक्कम मागू लागला. पैसे न दिल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत राहिला.


(पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणांशी संबंधित सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यात आले आहे.)

Comments
Add Comment