Thursday, April 3, 2025
Homeताज्या घडामोडीरत्नागिरी : ट्रकची दुचाकीला धडक, स्वार ठार, ट्रक पेटविला

रत्नागिरी : ट्रकची दुचाकीला धडक, स्वार ठार, ट्रक पेटविला

रत्नागिरी : निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने अपघात करणारा ट्रक पेटवून दिला.

हा अपघात चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर घडला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटरसायकलस्वाराला चारशे फूट फरपटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण खंडाळा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्सने केल्या भावना व्यक्त

अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखी गंभीर बनवली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांमध्ये अजूनही संतापाचे वातावरण आहे. नियम तोडून बेफान वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -