Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वशेअर बाजार गडगडला

शेअर बाजार गडगडला

मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार गडगडला. ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १,४०० अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स १,३९० अंकांच्या घसरणीसह ७६,०२४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर स्थिरावला. मुख्यत: आयटी आणि बँकिंग शेअर्सच्या घसरणीचा बाजारावर अधिक दबाव राहिला.

e-Bike Taxi : आता राज्यात ई-बाइक टॅक्सी धावणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिल रोजी परस्पर शुल्क म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ लागू करणार असल्याच्या चिंतेने बाजाराला घेरले. यामुळे गुंतवणूकदार सावध झाले असून ऑटो वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले. निफ्टी रियल्टी ३.१ टक्के आणि आयटी प्रत्येकी २.४ टक्के घसरले. फायनान्सियल आणि कन्झ्यूमर ड्यूरेबल्स हे निर्देशांकही घसरले. बीएसई मिडकॅप शेअर्समध्येही विक्रीचा मारा दिसून आला. मिडकॅप १ टक्के घसरला. तर बीएसई स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -