Wednesday, April 2, 2025
HomeदेशShivraj Singh Chauhan : शिवराज सिंह चौहान भाजपाध्यक्ष होणार?

Shivraj Singh Chauhan : शिवराज सिंह चौहान भाजपाध्यक्ष होणार?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड एप्रिलमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पदासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर आहे.

येत्या ६ एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. दरम्यान, १४ मार्चपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडीला होणारा विलंब, संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक आणि हिंदू नववर्षाचे महत्त्व अशा विविध कारणांमुळे ही प्रक्रिया लांबली. रविवारी पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा झाला. यामध्ये पंतप्रधानांची सरसंघचालकांसोबत बैठक झाली. त्यामुळे भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग सुकर झाल्याचे समजते.

Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड तेव्हाच होऊ शकते जेव्हा देशात अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील. जेव्हा १८ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पुर्ण होतील तेव्हाच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकेल. पुढच्या काहीच दिवसात या निवडी झालेल्या असतील. त्यामुळे लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. शिवराज सिंह चौहान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत शिवराज सिंह चौहान ?

केंद्रीय कृषी आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते आहेत. भाजपाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवलेले नेते अशीही त्यांची ओळख आहे. शिवराज सिंह चौहान यांनी तब्बल चार वेळा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी २००० ते २००४ या काळात चौदाव्या लोकसभेचे सदस्य असताना दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. ते कृषी समितीचे सदस्य, नफा कार्यालयांच्या संयुक्त समितीचे सदस्य, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, संसदीय मंडळाचे सचिव आणि सचिव (केंद्रीय निवडणूक समिती) होते. त्यांनी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीचेही नेतृत्व केले. नीतिमत्ता समितीचेही ते सदस्य होते. यानंतर १८ व्या लोकसभेवेळी ते पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात आले. यावेळी विदिशा लोकसभा मतदारसंघातून ते आठ लाख २१ हजार ४०८ मतांनी विजयी झाले. या विजयानंतर ते केंद्रीय कृषी आणि ग्राम विकास मंत्री म्हणून काम करत आहेत. उत्तम जनसंपर्क असलेली, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेली, जनतेशी सहज संवाद साधून त्यांचा विश्वास संपादीत करण्यास सक्षम असलेली व्यक्ती असल्यामुळे शिवराज सिंह चौहान यांना त्यांचे मतदार तसेच राजकीय वर्तुळात अनेकजण आदराने आणि प्रेमाने शिवराज मामा म्हणून ओळखतात. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रातले इतर वरिष्ठ नेते आणि संघ परिवार या सर्वांशी सहज जुळवून घेऊ शकणारी व्यक्ती असल्यामुळे शिवराज सिंह चौहान यांचे नाव भाजपाध्यक्ष या पदासाठी आघाडीवर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -