Vari Movie : पंढरपूरची ‘वारी’ आता चित्रपटरूपाने येणार वारकऱ्यांच्या भेटीला!

मुंबई : वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे (Pandharpur Wari) पाहिलं जातं. 'प्रवास ओढीचा, विठ्ठलाच्या गोडीचा' अशी भावना असणारी वारी प्रत्येकाला ओळखीची असली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. पंढरपूरी विठूरायाला भेटण्याची तळमळ असतेच, पण त्यापेक्षाही पायी वारीतून वाटचाल करण्याचा आनंद आभाळाएवढा असतो. हीच अनुभूती करुन देणारा 'वारी' प्रवास (Vari Movie) चित्रपटरुपाने सर्वांच्या भेटीस येणार आहे. (Entertainment)



महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ मराठी चित्रपट सादर करणार आहे. वारकरी भक्तांना ‘आतून’ श्रीमंत करणारी वारीची परंपरा आणि मराठी मातीचं सांस्कृतिक वैभव 'वारी' चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न (Vari Movie) झाला. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले.


अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे. वारीत अध्यात्म आहे, मॅनेजमेंट आहे, लोककला, संगीत, संस्कृती, मानवी भाव भावनांचा संगम सर्वच बघायला मिळतं. त्यामुळं वारीला शिक्षणाचं लोकपीठ का म्हटलं जातं हे वारीत आल्यानंतरच कळतं. ‘कितीही लिहिलं तरी आणि वाचलं तरी वारी कळणार नाही..त्यासाठी वारीतच गेलं पाहिजे..आम्ही सुद्धा चित्रपटरुपी 'वारी' तून हा प्रवास अनुभवणार आहोत, याचा आनंद कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला’.


राज फिल्म्स अँड डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत ‘वारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे तर निर्मिती राजेश सावळाराम पाटील यांची आहे. चित्रपटाची कथा मनोज येरुणकर यांची असून पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायाचित्रण योगेश कोळी यांचे आहे. कार्यकारी निर्माता महेश चाबुकस्वार आहेत. ‘वारी’ चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. (Vari Movie)

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.