Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीVari Movie : पंढरपूरची ‘वारी’ आता चित्रपटरूपाने येणार वारकऱ्यांच्या भेटीला!

Vari Movie : पंढरपूरची ‘वारी’ आता चित्रपटरूपाने येणार वारकऱ्यांच्या भेटीला!

मुंबई : वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे (Pandharpur Wari) पाहिलं जातं. ‘प्रवास ओढीचा, विठ्ठलाच्या गोडीचा’ अशी भावना असणारी वारी प्रत्येकाला ओळखीची असली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. पंढरपूरी विठूरायाला भेटण्याची तळमळ असतेच, पण त्यापेक्षाही पायी वारीतून वाटचाल करण्याचा आनंद आभाळाएवढा असतो. हीच अनुभूती करुन देणारा ‘वारी’ प्रवास (Vari Movie) चित्रपटरुपाने सर्वांच्या भेटीस येणार आहे. (Entertainment)

Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल

महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ मराठी चित्रपट सादर करणार आहे. वारकरी भक्तांना ‘आतून’ श्रीमंत करणारी वारीची परंपरा आणि मराठी मातीचं सांस्कृतिक वैभव ‘वारी’ चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न (Vari Movie) झाला. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले.

अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे. वारीत अध्यात्म आहे, मॅनेजमेंट आहे, लोककला, संगीत, संस्कृती, मानवी भाव भावनांचा संगम सर्वच बघायला मिळतं. त्यामुळं वारीला शिक्षणाचं लोकपीठ का म्हटलं जातं हे वारीत आल्यानंतरच कळतं. ‘कितीही लिहिलं तरी आणि वाचलं तरी वारी कळणार नाही..त्यासाठी वारीतच गेलं पाहिजे..आम्ही सुद्धा चित्रपटरुपी ‘वारी’ तून हा प्रवास अनुभवणार आहोत, याचा आनंद कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला’.

राज फिल्म्स अँड डिस्ट्रीब्युशन प्रस्तुत ‘वारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे तर निर्मिती राजेश सावळाराम पाटील यांची आहे. चित्रपटाची कथा मनोज येरुणकर यांची असून पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायाचित्रण योगेश कोळी यांचे आहे. कार्यकारी निर्माता महेश चाबुकस्वार आहेत. ‘वारी’ चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. (Vari Movie)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -