Wednesday, April 2, 2025
Homeताज्या घडामोडीमहापालिकेची राज्य शासनाकडे १,८१,००० दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची मागणी

महापालिकेची राज्य शासनाकडे १,८१,००० दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची मागणी

वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पाणीसाठ्यात घट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ५,४५,१८३ दशलक्ष लिटर (३७.६७टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढ चालल्या आहेत. परिणामी, अधिकाधिक प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा आटत चालला आहे. दुसरीकडे, पाऊस जून महिन्यात वेळेत न पडल्यास अथवा लांबणीवर पडल्यास मुंबईला दररोजचा पाणीपुरवठा सुरळीतपणे कसा काय करणार? या समस्येमुळे मुंबई महापालिकेने राज्य शासनाकडे १,८१,००० दशलक्ष लिटर इतक्या राखीव पाणीसाठ्याची मागणी आयुक्तांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.

यामध्ये, भातसा तलावातून १.१३ लाख दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा तलावातन ६८ हजार दशलक्ष लिटर म्हणजे दोन तलावातून एकूण १.८१ लाख दशलक्ष लिटर एवढ्या राखीव पाणीसाठ्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य शासनाकडून २,२८,१३० दशलक्ष लिटर इतक्या राखीव पाणीसाठ्याची मागणी केली होती. मात्र गेल्या वर्षी जून महिन्यात कमी परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने आणि पावसाळा १५ ऑक्टोबरपर्यंत असल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात चांगला पाऊस पडून पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला होता.

पुढील चार महिने १० दिवस पुरेल इतके पाणी

पालिकेने गतवर्षी मुंबईत ३० मे पासून प्रारंभी ५ टक्के नंतर ५ जूनपासून १० टक्के लागू केलेली पाणी कपात नंतर मागे घेण्यात आली होती. मात्र पालिकेने गतवर्षीच्या तुलनेत यंदा राखीव पाणीसाठ्यातून ४७,१३० दशलक्ष लिटर कमी म्हणजे १.८१ लाख दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची मागणी केली आहे. पावसाळा वेळेत सुरू न झाल्यास पालिका प्रशासन उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेत आवश्यक तेवढी पाणीकपात लागू करण्यात येईल अथवा राज्य सरकारकडे अधिकचा पाणीसाठा मागवून घेण्यात येईल, असे पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सद्यस्थितीमध्ये सात तलावात ५,४५, १८३ दशलक्ष पाणी शिल्लक

मुंबईला अप्पर वैतरणा, मध्या वैतरणा, भातसा, मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणामधून दररोज ४००० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो, तर ठाण, मिवडी आणि निजामपूर पालिका हद्दीत पालिका १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करते, सध्या मार्च महिना सुरू असून जून महिन्याच्या मध्यापर्यंत पालिकेला मुंबईकराना सुरळीत पाणीपुरवठा करणे भाग आहे. सध्या सात तलावात ५.४५, १८३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा मुंबईला पुढील चार महिने १० दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे जर पावसाळा लांबला म्हणजे पाऊस जून महिन्यात वेळेत सुरू न झाल्यास मुंबई महापालिका राज्य शासनाकडून मागणी केलेला १,८१,००० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा मुंबईकरांना पुरविण्यासाठी खुला करेल, अर्थात त्या राखीव पाणीसाठ्यामधून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -