Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यात म्हाडा १९ हजार ४९७ घरे बांधणार

राज्यात म्हाडा १९ हजार ४९७ घरे बांधणार

१६ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

मुंबईत येत्या आर्थिक वर्षात ५ हजार सदनिकांचे उद्दिष्ट

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात १६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाचा सन २०२४-२५ चा सुधारित व सन २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला.

प्राधिकरणाच्या सन २०२५-२०२६ च्या १५९५६.९२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात ५१९९ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत ९९०२ सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट असून सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी १४०८.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मंडळाअंतर्गत १८३६ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५८५.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १००९.३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २३१.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मंडळाअंतर्गत ९१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती मंडळाअंतर्गत १६९ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अर्थसंकल्पात ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी रुपये, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुर्लीच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरासाठी ५७.५० कोटी रुपये, बोरिवली सर्वे क्र. १६० वरील योजनेसाठी २०० कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली योजनेसाठी ८५ कोटी रुपये, एक्सर बोरिवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -