Saturday, July 5, 2025

भारतीय रेल्वेकडून होणार देवभूमीची यात्रा

भारतीय रेल्वेकडून होणार देवभूमीची यात्रा

प्रवाशांचा होणार सुरक्षित, आरामदायक प्रवास


मुंबई (प्रतिनिधी) : देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टरिनम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालविण्यात येणार आहे. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आणि 'देखो अपना देश' या उपक्रमांतर्गत ही विशेष ट्रेन उत्तर भारतातील पवित्र धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणारी असणार आहे.


या विशेष तीर्थयात्रा ट्रेनमुळे प्रवाशांना एकाच प्रवासात हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, वैष्णो देवी, कटरा, मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या ठिकाणांची यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. ही विशेष ट्रेन १७ एप्रिल २०२५ रोजी पुणे स्थानकावरून सुटेल. य़ाशिवाय पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-भेस्तान (सुरत) वडोदरा या स्थानकांवरून प्रवासी चडू किंवा उत्तरू शकणार आहेत. ७५० पर्यटक या ट्रेनमधून प्रवास करू शकतील.


हा नऊ रात्री १० दिवसांचा प्रवास असणार असून, तब्बल पाच हजार किमी अंतर ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन एसी, नॉन एसी असणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी विशेष सुविधा आयआरसीटीसीकडून देण्यात आलेली आहे. एसी, नॉन एसी बजेट हॉटेलमध्ये मुक्काम, सकाळी चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा-कॉफी आणि रात्रीचे जेवण (शाकाहारी), एसी, नॉन एसी वाहनांद्वारे स्थानांतरण व पर्यटन, संपूर्ण प्रवासासाठी विमा कव्हर आणि आयआरसीटीसीच्या टूर मॅनेजरकडून मार्गदर्शन आदींचा समावेश असणार आहे. ही भारत गौरव दुरिस्ट ट्रेन प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक तीर्थयात्रेचा अनोखा अनुभव देणार आहे.



गौरव गंतव्य आणि स्थळदर्शन


हरिद्वार हर की पौडी, गंगा आरती, ऋषिकेश वाघा बॉर्डर • अमृतसर- सुवर्ण मंदिर, कटरा माता वैष्णो देवी मंदिर • मथुरा-वृंदावन - श्रीकृष्ण जन्मभूमि आग्रा - ताजमहाल



टूर पॅकेजचे दर


इकॉनॉमी क्लास (स्लीपर) - १८,२३० रु
कम्फर्ट क्लास (३एसी)- ३३,८८० रु.
कम्फर्ट क्लास (२एसी) - ४१,५३० रु.



अशी होणार बुकिंग


भारतीय रेल्वेने 'देखो अपना देश' आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनांना बळकटी देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही अभिनव संकल्पना साकारली आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा