मुंबई: आजच्या काळात आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. यात डायबिटीज, हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर यांचा समावेश आहे.या समस्यांमुळे व्यक्तीचे वयही कमी होत आहे. मात्र प्रत्येकाला वाटते की आपले आयुष्य दीर्घकालीन असावे.
मात्र जर तुम्हाला दीर्घकालीन आयुष्य जगायचे असेल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जीवनात पाळल्याच पाहिजेत.
व्यायाम
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला व्यायाम गरजेचा आहे. घाम आल्यानंतर ४५ मिनिटे व्यायाम करणे सगळ्यात महत्त्वाचे. कार्डिओ, वेट ट्रेनिंग, हाय इंटेंसिटीसारखे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता.
योग्य जेवण
आपल्या जीवनाच निरोगी जेवणाला अधिक महत्त्व आहे. यासाठी आपले डाएट व्यवस्थित ठेवले पाहिजे. डाएट्समध्ये मिलेट्स, फायबर, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा समावेश केला पाहिजे.
दिनचर्या आणि झोप
सगळ्यांनी आपले एक रूटीन बनवले पाहिजे. जसे आयुर्वेदात सूर्योदयानंतर उठणे आणि सूर्यास्तानंतर खाणे वर्ज्य मानले गेले आहे. सोबतच कमीत कमी ८ तासांची झोप घेणेही गरजेचे आहे.
औषधे
आजच्या काळात लोकांना थोडीशी जरी आरोग्याची समस्या आली तर ते औषधे घेतात. मात्र शक्य होईल तितके औषधांपासून दूर राहिले पाहिजे. औषधे हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात.