Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Audi : ऑडी इंडियाच्या विक्रीत पहिल्‍या तिमाहीत वाढ

Audi : ऑडी इंडियाच्या विक्रीत पहिल्‍या तिमाहीत वाढ
मुंबई : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत १२२३ गाड्यांची विक्री केली. कंपनीने २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२५ च्या पहिल्या तिमाहीत १७ टक्के जास्त कार विक्री केली. भारतात ऑडीच्या लक्झरी कारची मागणी वाढत असल्याचे हे निदर्शक आहे.
भारतात ऑडी क्‍यू७ आणि ऑडी क्‍यू८ या लक्झरी मॉडेलना मागणी आहे. ऑडी इंडियाने भारतात आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त कारची विक्री केली आहे. ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीच्या उत्पादनांविषयीची भारतातील विश्वासार्हता वाढली आहे. यामुळेच कंपनीच्या कार विक्रीत वाढ होत आहे. कामगिरीतील सातत्य आणि वाढ यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनात उत्साहाचे तसेच आनंदाचे वातावरण आहे. भारतीय ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिसादात येणाऱ्या काळात आणखी वाढ होईल, असा विश्वास कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों यांनी २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील कार विक्रीचे आकडे जाहीर करत आनंद व्यक्त केला. लक्झरी कारच्या भारतातील विक्रीत होत असलेली वाढ उत्साहवर्धक असल्याचे ते म्हणाले. आमच्या उत्पादनांविषयी भारतीय ग्राहकांमधील विश्वासार्हता वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही अपवादात्‍मक उत्‍पादने आणि उत्तम अनुभव वितरित करण्‍यासाठी कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. ऑडी अप्रूव्‍ह्ड : प्‍लस या ब्रँडच्‍या पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने आपली विकास गती कायम राखली, जेथे २०२४ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत २३ टक्‍के वाढ केली. देशभरातील प्रमुख ठिकाणी २६ केंद्रांसह कार्यरत राहत हा विभाग प्रमाणित पूर्व-मालकीच्‍या लक्‍झरी वेईकल्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या ऑडी इंडियाच्‍या धोरणाचा आधारस्‍तंभ आहे. ऑडी इंडियाने नुकतेच 'ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स' लाँच केली, जी ऑडीच्‍या लाइनअपमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्‍ही आहे आणि या एसयूव्‍हीमध्‍ये लक्‍झरीच्‍या लॅपमधील दैनंदिन उपयुक्‍ततेसह अपवादात्‍मक कार्यक्षमता आहे. या एसयूव्‍हीला ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीपर्यंत संपूर्ण विक्री करण्‍यात आली आहे. ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ : ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू५, ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन स्‍पोर्टबॅक, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.
Comments
Add Comment