Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीGhibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल

Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल

मुंबई : सोशल मीडियाचे (Social Media) जाळे जगभरात पसरत असून विविध ॲपचे लोकांना वेड लागत आहे. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे माणूस सहज ओढला जातो. विविध फोटो आणि व्हिडिओच्या चलत्या ट्रेंडमध्ये आता ‘घिबली’ (Ghibli Style Image) नावाच्या वादळाने तुफान घातले आहे. गेल्या काही दिवसांत चॅट जीपीटीद्वारे (Chat GPT) तयार केले जाणाऱ्या घिबली आर्ट माणसांच्या फोटोला कार्टूनचे रुप दिले जात आहे. अगदी लहानग्यांपासून वयोवृद्ध तसेच सर्व अभिनेते आणिि राजकारणातील लोकं देखील या ट्रेंडचा वापर करत आहेत. अनेकजण स्वतःचे, मित्र-मैत्रिणींचे, कुटुंबाचे फोटो वापरून आकर्षक इमेजेस तयार करत आहेत आणि सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इतकेच नव्हे तर त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा मोठा वर्षाव देखील होत आहे. पण या मनोरंजनाच्या मागे एक मोठा धोका लपलेला आहे का? तुमचा फोटो एआयसोबत (AI) शेअर करणे म्हणजे नकळत तुमची ओळख धोक्यात घालण्यासारखे आहे का? असे अनेक प्रश्व नागरिकांच्या मनाला भेडसावत आहेत. त्यामुळे घिबलीचा धोका आहे का, जाणून घ्या.

Maharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

घिबली किंवा इतर कोणतीही एआय इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो एआय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो. आपण नकळतपणे आपली अत्यंत वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती म्हणजेच आपल्या चेहऱ्याची ओळख (Facial Identity) एआय कंपन्यांना देत असतो. ही गोष्ट पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर चोरीला जाण्यापेक्षाही जास्त धोकादायक मानली जाते. एकदा का तुमच्या चेहऱ्याचा डेटा चोरीला गेला किंवा त्याचा गैरवापर झाला, तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात.

चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तंत्रज्ञानाची (Facial Recognition Technology – FRT) बाजारपेठ वेगाने वाढत आहे. स्टॅटिस्टाच्या (Statista) अहवालानुसार, २०२५ मध्ये ही बाजारपेठ ५.७३ अब्ज डॉलर्सची असेल आणि २०२१ पर्यंत ती १४.५५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे (१६.७९% CAGR). मेटा (Meta) आणि गूगल (Google) सारख्या मोठ्या कंपन्यांवरही युजर्सच्या फोटोंचा वापर त्यांच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी केल्याचे आरोप झाले आहेत. पिमआईज (PimEyes) सारख्या वेबसाइट्समुळे तर कोणीही फक्त फोटो वापरून एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन शोधू शकते, ज्यामुळे ओळख चोरीचा धोका आणखी वाढतो.

हे धोके टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे हा एकमेव मार्ग आहे. कोणत्याही एआय टूलचा वापर करण्यापूर्वी विचार करा की तुमचा फोटो किंवा डेटा कसा वापरला जाईल. सोशल मीडियावर कमी रिझोल्यूशनचे फोटो अपलोड करा. शक्य असल्यास फेस अनलॉकऐवजी पिन किंवा पासवर्ड वापरा.

Ghibli AI आर्टचे धोके कोणते?

  • गोपनीयतेचा भंग : युजर्सचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकतात.
  • ओळख चोरी : फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख चोरली जाऊ शकते.
  • डेटा सिक्युरिटी : युजर्सची माहिती सुरक्षित राहू शकत नाही आणि हॅकिंगला बळी पडू शकते.
  • चुकीचा वापर : फोटोंचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो, जसे की फेक प्रोफाइल तयार करणे.
  • कायदेशीर मुद्दे : युजर्सच्या फोटोंचा अनधिकृत वापर कायदेशीर समस्या निर्माण करू शकतो. ही जोखीम लक्षात घेऊन युजर्सनी आपले फोटो शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -