नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर ‘घिब्ली’ शैलीतील चित्रांनी (Ghibli image) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटिझन्स चॅटजीपीटी, ग्रोक आणि विविध एआय इमेज जनरेटर सारख्या टूल्सचा वापर करून आपल्यासह आपल्या आवडत्या पात्रांचे ‘घिब्ली’च्या शैलीतील फोटो शेअर करत आहेत. सोशल मीडियावर एआय-जनरेटेड प्रतिमांची चर्चा रंगली. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी घिबली-शैलीतील ऍडनिमेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शविणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
भारत सरकारच्या अधिकृत अकाउंट, माय गव्हर्नमेंटने ट्विटरवरील (एक्स) पोस्टमध्ये शेअर केलेल्या प्रतिमांमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करताना, फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पोज देताना, सिंहाच्या पिलांशी खेळताना आणि अयोध्येतील राम लल्ला मंदिराला भेट देतानाच्या इमेज शेअर करण्यात आल्या आहेत.
e-Bike Taxi : आता राज्यात ई-बाइक टॅक्सी धावणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याा ‘घिब्ली’ इमेजचे शेअर करत ऑल्टमन यांनी भारतीय ध्वजाच्या इमोजीसह पोस्ट पुन्हा पोस्ट केली आहे. तसेच पोस्टच्या कॅप्शकनमध्ये लिहिलं आहे की, “मुख्य पात्र? नाही. संपूर्ण कथानकाचा अनुभव आहे. स्टुडिओ घिबली स्ट्रोकमध्ये नवीन भारताचा अनुभव घ्या”.ऑल्टमन यांच्या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तत्काळ प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ओपनएआयचे सीईओ देशातील कंपनीच्या विस्तार योजना पाहता या प्रतिक्रियेद्वारे भारतीय ग्राहकांना जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काहींनी म्हटले आहे.
Main character? No.
He’s the whole storylineExperience through New India in Studio Ghibli strokes.#StudioGhibli#PMModiInGhibli pic.twitter.com/bGToOJMsWU
— MyGovIndia (@mygovindia) March 28, 2025
गेल्या आठवड्याच्या ऑल्टमनने चॅटजीपीटी वापरकर्त्यांना इंटरनेटवर घिबली ट्रेंडने व्यापून टाका, असे आवाहन केले होते. इमेजेस जनरेट करताना तुम्ही शांत राहू शकाल का? हे वेडेपणाचे आहे. आमच्या टीमला झोपेची गरज आहे असेही ऑल्टमन यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते. जीपीटी-४ओ द्वारे समर्थित चॅट-जीपीटीच्या नवीनतम इमेज जनरेटरच्या अत्यधिक वापरामुळे ओपीन-एआय वर सर्व्हर लोड झाला होता, ज्यामुळे फर्मची सेवा मंदावली होती. कंपनीने इमेज-जनरेटिंग फीचर्स लाँच केल्यापासून, सोशल मीडिया घिबली इमेजेसने भरले आहेत. हे फीचर पॉप कल्चर आयकॉनपासून ते वैयक्तिक पोर्ट्रेटपर्यंत सर्व गोष्टी एका प्रसिद्ध जपानी ऍनिमेशन स्टुडिओच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये पुन्हा कल्पित करते. वापरकर्ते अभूतपूर्व वेगाने इमेजेस जनरेट करत आहेत.