Sunday, April 6, 2025
Homeमहाराष्ट्रडहाणूच्या महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा बैठक

डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा बैठक

महालक्ष्मी यात्रा १२ एप्रिल पासून होणार सुरु

कासा : पालघर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या  डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा  १२ एप्रिल पासून सुरू होणार आहे .या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात  डहाणू प्रांताधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकारी वर्ग , ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थीती मध्ये मंगळवारी नियोजन बाबतीत आढावा बैठक आयोजित केली होती.

सदर यात्रा जिल्हातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई , नाशिक बरोबरच गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्ताने येथे येत असतात. सतत १५ दिवस चालणाऱ्या हया यात्रेत दररोज दूरवरून लाखो भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने  ही नियोजन  बैठक पार पडली.

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मुलींना मिळणार १० हजार रुपये! नेमकी योजना काय?

डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामाची माहिती घेतली .तर प्रांतअधिकारी सत्यम गांधी यांनी यात्रेत होणारी भाविकांची गर्दी,सोयीसुविधा लक्षात घेता यात्रा सुरळीत चालावी यासाठी पाणी नियोजन ,दर्शन ,पार्किंग व्यवस्था , विज सुविधा या बाबतीत अधिकाऱ्यांना सुचना दिला तसेच पार्किंग मध्ये सुरक्षितादृष्टीने मालकांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य असल्याचे सांगितले .यात्रे निमीत्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता ट्रस्ट कडून केल्या जाणाऱ्या सोयीसुविधा ची माहिती ट्रस्ट चे सचिव शशिकांत ठाकूर यांनी दिली तसेच कचरा नियोजन, पिण्याचे पाणी. या बाबतींत ग्रामपंचायत कडून माहिती दिली.

या आढावा बैठकीस डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, पोलीस उपअधीक्षक डॉ भागिरथी पवार,डहाणू पंचायत समिती गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते, कासा पोलीस निरिक्षक अविनाश मांदळे , डहाणू पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे ,डहाणू नगर परिषद मुख्यधिकारी अक्षय गुडदे, ट्रस्टचे उपाध्यक्ष चंदू सातवी, कोषाध्यक्ष किशोर सातवी, सरपंच नितेश भोईर ,रमेश मलावकर,अनंता खुलात ,योगेश सातवी तसेच महावितरण अधिकारी व आरोग्य, विद्युत, बांधकाम, महसूल, आदी विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -