Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीShiv Sena : ‘कुणाल कामराचे शिवसेना स्टाईलने स्वागत करु’

Shiv Sena : ‘कुणाल कामराचे शिवसेना स्टाईलने स्वागत करु’

राहुल कनाल यांचा सूचक इशारा

मुंबई : मुंबई पोलिसांनी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) दोनवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. पण अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. असं असतानाच आता शिवसेना (शिंदे) (Shiv Sena) पक्षाचे युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी कुणाल कामराला धमकीवजा इशारा दिला आहे. ‘कुणाल कामरा जेव्हा मुंबईत येईल तेव्हा त्याचे शिवसेना स्टाईलने स्वागत करु’, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.

कुणाल कामराबाबत राहुल कनाल यांनी काय म्हटलं की, “कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. मात्र, तो दिलासा ७ एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं”, असं राहुल कनाल यांनी म्हटलं.

‘खरं बोलायला हिम्मत लागते’

दरम्यान, कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी तो वादात अडकला आहे. कुणाल कामराच्या या गाण्यानंतर त्याच्याविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, यानंतर कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने अटपूर्व जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -