मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवर भरमराठ कर अर्थात टॅरिफ लावण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्यापासून नागरिकांचा सोन्याकडे असलेला ओढा पुन्हा वाढू लागला आहे. भारतात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.
सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ९३ हजार ४१५ रुपये ८० पैसे झाला आहे. सोन्याने ९३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात होत असलेली वाढ बघता लवकरच सोन्याचा दर एक लाखाचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Vodafone Idea share : व्होडाफोन आयडिया कंपनीला केंद्र सरकारने दिले जीवनदान
सोन्याच्या बाजारातून आलेल्या रिपोर्टनुसार, सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ९३ हजार ४१५ रुपये ८० पैसे तर २२ कॅरेटच्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८५ हजार ६३१ रुपये १५ पैसे झाला आहे.
सोमवार ३१ मार्च २०२५ रोजी मुंबईतले सोन्याचे दर
२४ कॅरेट सोन्याचा दर
-
१ ग्रॅम – ९३३२ रुपये २० पैसे
-
१० ग्रॅम – ९३३२२ रुपय
२२ कॅरेट सोन्याचा दर
- १० ग्रॅम – ८५५४५ रुपये १७ पैसे