
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या कटात सामील असलेल्या संशयित गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यातील संशयित असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याचे म्हटले जात आहे. पण तुरुंगात असणाऱ्या या आरोपींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहे. याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
/>
मिळालेल्या माहितीनुसार वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये नऊ नंबरच्या बराक मध्ये आहे.त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी ही याच जिल्हा कारागृहात असून त्याच कारागृहामध्ये आहेत. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील या जिल्हा कारागृहात आहे. आरोपी वाल्मीक कराड आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद असल्याचे समोर येत आहे. बीड जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला दोन कैद्यांकडून तुरुंगात मारहाण झाली आहे. महादेव गित्ते, अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं समजतं आहे.
बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येतंय. हा वाद कशामुळे घडला? याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.