सोलापूर : हैदराबाद येथून टाटा मूलभूत संशोधन केंद्राने खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेला ८०० किलो वजनाचा टेलिस्कोप (दुर्बीण) पॅराशूटसह अचानक सांगोला शहरातील मानवी वस्ती पडल्याने एकच खळबळ उडाली. अचानक वाऱ्याची दिशा बदलामुळे हे उपकरण मानवी वस्तीत कोसळले असले तरी यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही. एका कारचे मोठे नुकसान झाले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फांडामेंटल रिसर्च सेंटर (टीआयएफआर) बलून फॅसिलिटी नॅशनल सेंटर ऑफ गर्व्हमेंट ऑफ इंडिया शाखा हैदराबाद या संशोधन केंद्राकडून अवकाशातील ताऱ्यांची नोंद घेण्यासाठी पॅराशूट व बलूनच्या सहकार्याने टेलिस्कोप (दुर्बीण) अवकाशात २५ कि.मी. अंतरावर सोडले होते.
TMKOC : असित कुमार मोदी यांच्या नीला प्रीमियर लीग क्रिकेटच्या माध्यमातून TMKOC कुटुंब एकत्र!
या टेलिस्कोपच्या माध्यमातून रात्रीत ताऱ्यांचा अभ्यास करणे, त्याच्या नोंदी ठेवणे हे काम पूर्ण केले जाते. त्याप्रमाणे सदरचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. परंतु हा बलून कट करून पॅराशूट मशिनसह खाली उतरविण्याचा प्रयत्न सुरू असताना हवामानात बदल व वाऱ्याची दिशा बदलल्याने सांगोला शहराजवळ असलेल्या खारवटवाडी येथे पडले. तर, त्यानंतर ओपन झालेले बलून टेलिस्कोप (दुर्बीण) मशिनसह शहरातील खडतरे गल्लीत मनुष्य वस्तीत लिंबाच्या झाडावर क्रॅश होऊन झाडाखाली असलेल्या कारवर कोसळले.