सोलापूर : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले तर शरद पवार गटाचे १० आमदार निवडून आले. निवडणूक निकालाला पाच महिने पण झाले नाहीत तोच शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. मतदारसंघातील कामं व्हावी, विकासाची कामं झपाट्याने व्हावी म्हणून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
Narendra Modi Private Secretary : कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव ? जाणून घ्या
राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या बदल्यात शरद पवार गटाच्या आमदारांना मतदारसंघांतील प्रत्येकी १०० कोटी रुपयांची विकासकामं प्राधान्याने पूर्ण केली जातील,असं आश्वासन मिळाल्याचं वृत्त आहे. हे आश्वासन मिळाल्यापासून शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते.
शरद पवार गटाचे दहा पैकी चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील आमदारांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिजीत पाटील (माढा), राजू खरे (मोहोळ), उत्तम जानकर (माळशिरस), नारायण पाटील (करमाळा) हे शरद पवार गटाचे चार आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. यामुळे हे चार आमदार आधी गळाला लावण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून सुरू असल्याचे वृत्त आहे.
Maharashtra Breaking News : सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपीना कारागृहात मारहाण
पक्षांतरबंदी कायद्याची अडचण टाळायची असल्यास अजित पवारांना शरद पवार गटाचे दहा पैकी किमान सात आमदार स्वतःच्या पक्षात आणणे आवश्यक आहे. सोलापूरचे चार आमदार राष्ट्रवादीत आले तर अजित पवार गटाची बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. यामुळे अजित पवार आधी सोलापूरमधील शरद पवार गटाच्या आमदारांनाच गळाला लावण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.