फिजिकल स्टँप पेपर १ एप्रिलनंतर होणार रद्दी कागद
लखनऊ : तेलगी स्टँप पेपर घोटाळा देशभर गाजला होता. ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा स्टँप पेपर घोटाळा २००३मध्ये उघडकीस आला होता. त्यानंतर स्टँप पेपरच्या प्रक्रियेत व्यापक बदल करण्यात आले.आता फिजिकल स्टँप पेपर बंद करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारकडून घेण्यात आला आहे. यामुळे १ एप्रिलपासून फिजिकल स्टँप पेपर रद्दी होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने फिजिकल स्टँप पेपर असल्यास त्याची नोंदणी करण्याची मुदत ३१ मार्च दिली होती. यामुळे ३१ मार्च रोजी १२ वाजल्यानंतर लाखो रुपयांचे फिजिकल स्टँप पेपर असले तरी ते रद्दी होणार आहे.
उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेने दिला १४व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेतच प्रसूती
उत्तर प्रदेश सरकारने ३१ मार्चनंतर फिजिकल स्टँप पेपरच्या वापरास पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यामुळे बाजारात असलेले सर्व फिजिकल स्टँप पेपर परत बोलवले आहे. ज्यांच्याकडे फिजिकल स्टँप पेपर आहे, त्यांची १० टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम परत देण्यात येणार आहे.मुदत संपवण्यास काही तास शिल्लक असताना हजारो खरीदारांकडे १०० कोटींपेक्षा जास्त रक्कमेचे फिजिकल स्टँप पेपर शिल्लक आहेत. त्या लोकांना आता आज शेवटची संधी आहे. www.igrsup.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन फिजिकल स्टँप पेपर परत देता येणार आहे. नोंदणी पावती असल्यास व्यक्ती १ एप्रिल रोजीसुद्धा फिजिकल स्टँप पेपर जमा करु शकतो.