Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडी'मुंबई लोकल' सिनेमा ११ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

‘मुंबई लोकल’ सिनेमा ११ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला “मुंबई लोकल” हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पाहता येणार आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत “मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेन्मेंटचे प्राची राऊत, सचिन अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. असोसिएट प्रोड्युसर त्र्यंबक डागा, सह दिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक सुमित पाटील आहेत. ऍक्शन सुनील रॉड्रिग्ज, निलेश गुंडाळे कार्यकारी निर्माता हर्षवर्धन वावरे, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

“मुंबई लोकल” या चित्रपटात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक प्रेम कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. ज्ञानदाच्या ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय ‘धुरळा’सारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक हलकीफुलकी, तरल प्रेमकथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. त्यासाठी ११ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -