रमजान ईद प्रेम, शांतता आणि सामाजिक ऐक्याचं प्रतिक ठरो - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : गुढीपाडवा व मराठी नववर्षा सोबत आलेली रमजान ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ व्हावे. रमजान ईदच्या निमित्तानं वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया.


यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोप्यानं, आनंदानं आणि उत्साहानं साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधूत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया... अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


रमजान ईदनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांसोबतच सर्वधर्मीय नागरिकही या सणाच्या आनंदात सहभागी होतात. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षासोबत आलेली यंदाची रमजान ईद वैशिष्ट्यपूर्ण आहे.


सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती

Vidyavihar Flyover : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ४५ मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत!

मुंबई: मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या 'विद्याविहार उड्डाणपूल' (ROB) प्रकल्पाचे काम

Mumbai News : मुंबईत फूड डिलिव्हरी करणारी तरुणी पोलीस दलातील नोकरीसाठी करत आहे तयारी

मुंबई : गर्दीने व्यापलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसरात्र एक तरूणी धावत असते. हातात फूड डिलिव्हरी बॅग आणि

Megablock Update : रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लकविषयी मोठी बातमी

मुंबई : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा (NEET-UG 2026 Re-Exam) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेच्या निमित्ताने प्रवास

EL Nino : एल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाईचे सावट; धरणसाठा घटला, शासन यंत्रणा सतर्क

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती आणि