
महिनाभर चालणाऱ्या उत्सवात मुस्लिम बांधव उपवास करतात. त्यातच ईदच्या दिवशी न चुकता बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शीर खुरमा, शीर म्हणजे दूध आणि खुर्मा म्हणजे सुक्या मेव्याचे मिश्रण. ज्यात भरपूर प्रमाणात दूध, ड्रायफ्रूट्स आणि शेवया असतात. शीर खुरम्यामध्ये भरपूर आणि निरोगी पौष्टीक असे पदार्थ असतात. शीर खुर्माशिवाय ईदचा सण अपूर्ण आहे. आता हा शीर खुरमा तुम्हालादेखील बनवायचा आहे का? तर घरच्या घरी तुम्ही चविष्ट असा शीर खुरमा झटपट बनवू शकता.आणि ईदचा आनंद द्विगुणित करु शकता.

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत... लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने ...
शीर खुरमा बनवण्यासाठी साहित्य :
५० ग्रॅम शेवया, २ मोठे चमचे खजुराचे काप, पाव कप साखर, पाव कप मनुका, पाव कप काजू, पाव कप पिस्ता, पाव कप तूप, पाव कप बदामाचे काप, छोटा अर्धा चमचा वेलची पूड
शीर खुरमा बनवण्याची कृती पहा :
१. सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात १ चमचा तूप गरम करून त्यात बदाम, काजू, मनुका , पिस्ता, बदाम आणि खजूर मंद आचेवर भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.
२. आता एक भांड घ्या, त्यात शेवया भाजून घ्या. मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यत शेवया भाजून घ्या.
३. आता एका मोठ्या पॅनमध्ये दूध घ्या आणि उकळू द्या.
४ आता दुधात केशर घाला आणि दूध जळू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा
५. साखर घालून नीट ढवळून घ्या.
६. आता भाजलेल्या शेवया घाला आणि नीट ढवळून घ्या.
७. दूध थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर उकळवा.
८. शेवया नीट शिजल्यावर त्यात वेलची पूड टाका.
९. आता त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालून चांगले मिसळा
१०. तयार आहे मलाईदार स्वादिष्ट शीर, खुरमा रेसिपी
आता शीर-खुरमा तुम्ही फ्रीजमध्ये थंड केल्यावर किंवा गरमा गरम देखील सर्व्ह करु शकता. शीर खुरमा चवीला स्वादिष्ट लागतो. आजची तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करू शकता.