मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव पदावर निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी २०१४ च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या (ISF) अधिकारी आहेत. पीएमओ आणि विविध खाती, विभाग आणि उपविभाग यांच्यातील समन्वयाचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून निधी तिवारी काम करतील.
पंतप्रधान मोदी २०१४ पासून वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. निधी तिवारी याच वाराणसी मतदारसंघातील मेहमूरगंज मधील रहिवासी आहेत. त्यांनी २०१३ मध्ये नागरी सेवा परीक्षेत ९६ वा क्रमांक मिळवला होता. निधी तिवारी यांना २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून राजदूत बिमल सन्याल स्मृती पदक आणि सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पदक मिळाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयात असताना निधी तिवारी यांनी निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात काम केले. तिवारी या २०२३ पासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त (वाणिज्यिक कर) म्हणून काम करत नोकरीसोबतच परीक्षेची तिवारी यांनी तयारी केली . त्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना रिपोर्ट करत होत्या. आता त्यांची वर्णी पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिवपदी झाली आहे.
पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिवपदी नियुक्ती झाल्यावर निधी तिवारींना पंतप्रधान यांची महत्त्वाची कामे हाताळावी लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांचे समन्वय करणे, बैठका आयोजित करणे आणि सरकारी विभागांशी संपर्क साधण्याचे काम त्या पाहतील. यापूर्वीही अनेक महिला अधिकाऱ्यांना पीएमओमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…