मुंबई:इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर मोठा विजय मिळवला आहे. मुंबईचा हा विजय एकतर्फीच म्हणावा लागेल. कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी ११७ धावांचे माफक आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान ८ विकेट गमावत सहज पूर्ण केले. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो ठरला अश्विनी कुमार. त्याने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतले. मुंबईसाठी रयान रिकेल्टननेही नाबाद अर्धशतकी खेळी केली.
पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबईचे हे पहिले जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सला या हंगामात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. मात्र मुंबईने आजच्या सामन्यात करून दाखवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टनने मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५.२ षटकांत ४६ धावांची भागीदारी केली. रोहित लयीमध्ये दिसत होता मात्र त्याला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. रोहितने १ षटकाराच्या मदतीने १२ बॉलमध्ये १३ धावा केल्या. येथून रियान रिकेल्टनने पाच चौकार आणि चाक षटकारांच्या मदतीने ४१ बॉलवर नाबाद ६२ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादवही २७ धावांवर नाबाद राहिले. केकेआरकडून २ विकेट आंद्रे रसेलने केले.