
मुंबई: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी सामना रंगणार आहे. दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सुरू होईल.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची आस आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्सने हरवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर राजस्थान रॉयल्सला हरवत हंगामातील पहिला विजय साकारला.
दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड
या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड आहे? मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हेड टू हेड काय रेकॉर्ड्स आहेत. आतापर्यंत मुंबई आणि कोलकाता यांच्यात ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला २३ वेळा हरवले आहे. तर कोलकाता नाईट रायजर्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वाधिक स्कोर २३२ धावा आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक स्कोर २१० आहे.
गेल्या ५ सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्सचा दबदबा
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गेल्या ५ सामन्यांत नजर टाकल्यास कोलकाता नाईट रायडर्सचा दबदबा स्पष्टपणे दिसतो. गेल्या ५ सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला ४ वेळा हरवले आहे. मात्र ओव्हरऑल रेकॉर्ड मुंबई इंडियन्सच्या हाती आहे. वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या संघाला विजय मिळवणार? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स हंगामातील पहिला विजय मिळवणार का? याची उत्तरे आजच्या सामन्यातून मिळतील.