
आहारात का सामील करावे तूप?
तूप हे लोण्यापासून बनवले जाते. तुपामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए, डी, ई आणि के असते. तसेच अँटी ऑक्सिडंट्ही मोठ्या प्रमाणात असतात. तुपामध्ये शॉर्ट चेन आणि मीडियम चेन फॅटी अॅसिड असतात यामुळे आपल्याला लगेच ऊर्जा मिळते.
तुपाचे फायदे
तुपामुळे पोटाच्या स्नायूंना पोषण मिळते. तसेच पचनतंत्र सुरळीत होते.
तुपाचे सेवन केल्याने अॅसिडिटी, सूज अथवा आयबीएस सारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना विशेष फायदा होतो.
जेवणासोबत तूपाचे सेवन केल्याने पाचक एन्झाईम्स तसेच पित्ताचे उत्पादन होते. यामुळे पचनात सुधारणा होते.
देशी तूप तुम्हाला वजन कमी करायलाही मदत करते. यामुळे वारंवार लागणारी भूक कमी होते. तसेच तुम्ही सतत खात नाही. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.