Tuesday, April 29, 2025
Homeक्राईमलिव्ह-इन वादातून दुहेरी आत्महत्या; नायगावात प्रेमीयुगुलाचा हृदयद्रावक अंत

लिव्ह-इन वादातून दुहेरी आत्महत्या; नायगावात प्रेमीयुगुलाचा हृदयद्रावक अंत

वसई : प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीनेही आत्महत्या केल्याची घटना नायगाव येथे उघडकीस आली आहे. जितेंद्र वर्मा आणि छाया गुप्ता असे या आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा (२४) आणि छाया गुप्ता (१७) या दोघांचे प्रेमसंबध होते. जितेंद्र हा नायगाव पूर्वेच्या कोल्ही गावातील आशानगर मधील अऱविंद चाळीत रहात होता. जितेंद्र एका खासगी कंपनीत कामाला होता. तर अल्पवयीन असलेली छाया शिक्षण घेत होती. जितेंद्रला छायासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र छाया त्यासाठी तयार नव्हती. ती लहान असल्याने एकत्र राहण्यास तयार नव्हती.

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? हत्या अनैतिक संबंधातून की दुसऱ्या कारणाने?

जितेंद्रने छायाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा आग्रह केला होता, मात्र ती तयार नव्हती. ती अजून लहान असल्यामुळे एकत्र राहणे तिला योग्य वाटत नव्हते. शनिवारी ती जितेंद्रला भेटायला त्याच्या घरी गेली असता त्यांच्यात यावरून वाद झाला. जितेंद्रला भीती वाटत होती की, जर छाया त्याच्यासोबत राहिली नाही तर ती भविष्यात त्याला सोडून जाईल. या भीतीने ग्रस्त झालेल्या जितेंद्रने तिला सांगितले की, जर तू माझ्यासोबत राहिली नाहीस, तर मी आत्महत्या करीन. छायाने त्याच्या या बोलण्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही, पण त्याच रात्री जितेंद्रने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

या घटनेने छाया पूर्णपणे हादरली. तिला जबरदस्त धक्का बसला होता आणि ती नैराश्यात गेली. कुटुंबियांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या मनातून अपराधीपणाची भावना काही केल्या जात नव्हती. तिला वाटत होते की, जर तिने जितेंद्रचे ऐकलं असतं, तर तो आज जिवंत असता. या भावनांनी तिला इतकं अस्वस्थ केलं की, अखेरीस रविवारी दुपारी तिनेही घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

जितेंद्र आणि छाया या दोघांचे प्रेमसंबंध होते. जितेंद्र हा छायाला लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह करत होता. परंतु छाया तयार नव्हती. म्हणून शनिवारी जितेंद्रने आत्महत्या केली आणि तो धक्का सहन न झाल्याने रविवारी छायाने देखील आत्महत्या केली, असे नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील यांनी सांगितले.

ही दुहेरी आत्महत्या नायगाव परिसरात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यांच्या मृत्यूमागील मानसिक तणाव आणि कारणांचा शोध घेतला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -