मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात जगभर अनेक क्रिएटर्सनी Facebook , Instagram आणि YouTube वर रील्स आणि शॉर्ट्स चा धुमाकूळ घातला आहे. Facebook आणि इंस्टाग्रामचा प्रतिसाद पाहता youtube क्रिएटर्सना व्ह्यूजची मोठी समस्या जाणवत होती.पण आता यूट्यूब या सोशल मीडिया कंपनीने YouTube Shorts मध्ये एक नवा बदल केला आहे.कंपनीने YouTube Shorts वरील व्ह्यूज मोजण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या Shorts च्या कार्यक्षमतेचा अधिक स्पष्ट अंदाज मिळेल. या बदलामुळे, Shorts व्ह्यूजची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या बदलामुळे क्रिएटरच्या व्ह्यूजची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. हा बदल ३१ मार्चपासून लागू करण्यात आला आहे.
काय आहे नवीन पद्धत ?
याआधी Shorts वर किती वेळेपासून ते पाहिले गेले, यावर आधारित व्ह्यूज मोजले जात होते पण या बदलामुळे व्ह्यूज मोजण्यासाठी ठराविक सेकंदांचा कालावधी न ठेवता, किती वेळा Shorts प्ले किंवा रिप्ले केले गेले यावर आधारित व्ह्यूज मोजले जातील.या नव्या पद्धतीमुळे Shorts वरील व्ह्यूजची संख्या नक्कीच वाढेल. असा You Tube ला विश्वास आहे.
क्रिएटर्ससाठी फायदा काय ?
या बदलामुळे, YouTube क्रिएटर्सना त्यांच्या Shorts ची कार्यक्षमता आणि लोकप्रियतेचा अचूक अंदाज घेता येईल. YouTube पार्टनर प्रोग्राम किंवा कमाईवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. याचा अर्थ, उत्पन्नावर किंवा कार्यक्रम पात्रतेवर पूर्वीच्या निकषांमध्ये काहीही बदल होणार नाही. यामुळे, क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटवर सुधारणा करण्यासाठी अधिक माहिती मिळेल, आणि ते त्यांच्या Shorts ची लोकप्रियता वाढवू शकतील.
क्रिएटर्सवर काय परिणाम होईल?
या बदलामुळे निर्मात्यांच्या उत्पन्नावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही YouTube ने असे स्पष्ट केले आहे क्रिएटर्स व्हिडिओंचे अधिक योग्य मूल्यांकन करू शकतील आणि त्यामुळे त्यांचा अनुभव आणि उत्पन्न दोन्ही वाढवू शकतात. YouTube Shorts च्या मोजणीमध्ये झालेल्या या बदलामुळे क्रिएटर्ससाठी एक रोमांचक संधी निर्माण झाली आहे.