Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
प्रशांत कोरटकरला तेलंगणातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरातून अटक करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेतले आणि २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २५ मार्च रोजी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यानंतर २८ मार्च रोजी पुन्हा एकदा हजर केले असताना त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. या कोठडीची मुदत संपताच त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोणी आणि कशा स्वरुपात मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत.
Comments
Add Comment