Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PM Modi in Nagpur : पंतप्रधान मोदी नागपुरात, हेडगेवारांना वाहिली आदरांजली

PM Modi in Nagpur : पंतप्रधान मोदी नागपुरात, हेडगेवारांना वाहिली आदरांजली
नागपूर : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी गुढी पाडवा हा सण साजरा करतात. चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. या नववर्षाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. मोदींनी नागपूरमध्ये आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली आणि त्यांना आदरांजली वाहिली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.



याआधी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. विमानतळावर उतरल्यावर पंतप्रधान मोदींनी नागपूरमध्ये असलेल्या दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दीक्षाभूमीवर जाऊन पंतप्रधान मोदींनी गौतम बुद्धांना वंदन केले आणि प्रार्थना केली.

नंतर संघ मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिराला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना आदरांजली वाहिली. डॉ. हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोघांची स्मारके नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आहेत. स्मृती मंदिरात आदरांजली वाहून पंतप्रधान मोदींनी तिथल्या अभ्यागत पुस्तिकेत संदेश लिहून स्वाक्षरी केली.

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि भारतीय जनता पार्टीचे वैचारिक पालक असल्याचे पंतप्रधान मोदींनी अभ्यागत पुस्तिकेत नमूद केले. अभ्यागत पुस्तिकेत पुढे मोदींनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाच्या स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत असल्याचेही नमूद केले.

/>


गोळ्वलकर गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २०१४ मध्ये स्थापन झालेल्या माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची अर्थात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाली. नव्या सुविधेत २५० खाटांचे रुग्णालय, १४ ओपीएस आणि १४ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. परवडणाऱ्या दरात सामान्यांना वैद्यकीय सेवा दिल्या जातील.

/>
पंतप्रधान मोदी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारुगोळा निर्मिती प्रकल्पालाही भेट देतील. ते यूएव्ही चाचणीसाठी १२५० मीटर लांब आणि २५ मीटर रुंद असलेल्या नव्याने बांधलेल्या हवाई पट्टीचे उद्घाटन करतील. तसेच आधुनिक शस्त्र निर्मिती प्रकल्पाचेही उद्घाटन करतील.

/>
असा आहे पंतप्रधान मोदींचा दौरा

विमानतळावर आमगन : सकाळी ८.४०
स्मृती मंदिर : ९ वाजता
दीक्षाभूमी : ९.३० वाजता
माधव नेत्रालय : १० वाजता
विमानतळ : ११.५० वाजता
सोलर डिफेन्स भेट : दुपारी १२.०५ वाजता
विमानतळ : १२.५० वाजता
बिलासपूरसाठी उड्डाण : १.३० वाजता
Comments
Add Comment