गुवाहाटी: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ११व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानसाठी नितीश राणाने ८१ धावांची खेळी केली.
राजस्थान रॉयल्सने या हंगामात सुरूवातीचे दोन सामने गमावले. पहिला सनरायजर्स हैदराबादकडून ४४ धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने ८ विकेटनी हरवले. दुसरीकडे सीएसकेने मुंबई इंडियन्सला ४ विकेटनी पराभूत करत हंगामाची शानदार सुरूवात केली. दरम्यान, त्यांना दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ५० धावांनी पराभव सहन करावा लागला.
टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने९ बाद १८२ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सची सुरूवात शानदार राहिली. तिसऱ्याच बॉलवर यशस्वी जायसवालची विकेट गेली. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर नितीश राणाने संजू सॅमसनसोबत मिळून डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. नितीशने २१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यामुळे त्यांनी पॉवरप्लेमध्ये ७९ धावा केल्या.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर नितीश राणाने ताबडतोब बॅटिंग सुरू ठेवली. नितीशच्या तुफानी खेळीचा अंत रविचंद्रन अश्विनने केला. अश्विनने नितीशला एनएस धोनीच्या हाती बाद केले. नितीशने ३६ बॉलमध्ये ८१ धावा केल्या. यात १० चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. नितीश बाद झाल्यानंतर राजस्थान संघाचे एकामागोएक विकेट पडत केले.
कर्णधार रियान परागने काही शॉट्स खेळला. रियानने दोन चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. त्याने २८ बॉलवर ३७ धावा केल्या. यानंतर जोफ्रा आर्चर खाते न खोलता बाद झाला.