मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. हा सामना राजस्थानने ६ धावांनी जिंकला. राजस्थानने सीएसकेला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना हे आव्हान गाठता आले नाही.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईची सुरूवात खराब झाली. त्यांनी शून्यावर रचिन रवींद्रची विकेट गमावली. यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने मिळून दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. राहुल सेट झाल्यानंतर त्याने विकेट गमावली. विजय शंकर बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, मोक्याच्या क्षणी ऋतुराज बाद झाला. ऋतुराजने वानिंदु हसरंगाने यशस्वी जायसवालच्या हाती बाद केले. ऋतुराजने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ बॉलमध्ये ६३ धावा केल्या.
तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ९ बाद १८२ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सची सुरूवात शानदार राहिली. तिसऱ्याच बॉलवर यशस्वी जायसवालची विकेट गेली. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर नितीश राणाने संजू सॅमसनसोबत मिळून डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. नितीशने २१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यामुळे त्यांनी पॉवरप्लेमध्ये ७९ धावा केल्या.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर नितीश राणाने ताबडतोब बॅटिंग सुरू ठेवली. नितीशच्या तुफानी खेळीचा अंत रविचंद्रन अश्विनने केला. अश्विनने नितीशला एनएस धोनीच्या हाती बाद केले. नितीशने ३६ बॉलमध्ये ८१ धावा केल्या. यात १० चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. नितीश बाद झाल्यानंतर राजस्थान संघाचे एकामागोएक विकेट पडत केले.
कर्णधार रियान परागने काही शॉट्स खेळला. रियानने दोन चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. त्याने २८ बॉलवर ३७ धावा केल्या. यानंतर जोफ्रा आर्चर खाते न खोलता बाद झाला.