मुंबई: खजूर एक पौष्टिक ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा मोठ्या प्रमाणात असतो. खजुरामुळे आपल्या शरीरास मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे मिळतात. याचा समावेश तुम्ही डाएटमध्ये केल्यास त्याचे बरेच फायेद होतात.
खजुरामध्ये फायबर, अँटी ऑक्सिडंट, व्हिटामिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. यामुळे डायबिटीज कंट्रोल करण्यासोबतच हृदयाच्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. काही महिलांच्या मते खजूर प्रजनन क्षमतेमध्ये योगदान देतात.
प्रेग्नंसीमध्ये खजूर खाण्याचे फायदे
गर्भावस्थेदरम्यान खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये फोलेटचे प्रमाण अधिक असते. यामुळे गर्भाचा विकास चांगला होतो. खजुरामध्ये बोरॉन असते हे असे खनिज आहे जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
खजुरामध्ये आर्यनचे भरपूर प्रमाण
खजुराच्या नियमित सेवनाने हाडांचे आरोग्य चांगले राहते. खासकरून महिलांच्या वाढत्या वयासोबतच. खजुरामध्ये आर्यनचे प्रमाण अधिक असते यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. हा व्हिटामिन बी५चा चांगला स्त्रोत आहे.
खजुरामध्ये व्हिटामिन सी
खजुरामध्ये व्हिटामिन सी आणि डी भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेजनचा विकास होते. खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट असतात यामुळे मेंदूचे कार्य चांगले राहते. खजुरामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता कमी होते. तसेच यात मॅग्नेशियमचे प्रमाणही अधिक असते.