Friday, April 25, 2025
HomeदेशChat Gpt Down Due To Ghibli : सोशल मीडियावर 'घिबली'चे तुफान; अतिवापरामुळे चॅटजीपीटी...

Chat Gpt Down Due To Ghibli : सोशल मीडियावर ‘घिबली’चे तुफान; अतिवापरामुळे चॅटजीपीटी डाउन!

मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर ‘घिबली (Ghibli) इमेज’चा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेकजण ओपन एआयच्या चॅटजीपीटी (Chat Gpt) आणि एक्स वरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीने घिबली स्टाईल फोटो (Ghibli Style image) बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. राजकारण्यासह अनेक अभिनेते देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत फोटो शेअर केले जात आहेत. मात्र आता घिबली इमेज चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Chat Gpt Down)

Gudi Padwa 2025 : चिरायू २०२५ सोहळ्यात उभारली ‘गोधडीची गुढी’!

ओपनएआयच्या चॅटजीपीटीमध्ये जागतिक स्तरावर आउटेज (Chat Gpt Down) येत आहे, ज्यामुळे स्टुडिओ घिबली फोटो तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांनाही अडथळा येत आहे. त्यांच्या अ‍ॅप आणि एपीआय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. ओपनएआयच्या चॅटजीपीटीच्या अपडेटमुळे स्टुडिओ घिबली फोटोमध्ये तुफान वाढ झाली आहे, त्यामुळे चॅटजीपीटी सेवा ठप्प झाली असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

ओपन एआयने (Open AI) अधिकृतपणे ही समस्या मान्य केली असून “आम्हाला सध्या समस्या येत आहेत”, तसेच “आम्हाला असे आढळून आले आहे की प्रभावित सेवांमध्ये वापरकर्त्यांना अडथळे येत आहेत. अडथळ्याचं लवलरच निराकरण केलं जाईल’ असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चॅट जीपीटी डाऊन झाल्यामुळे अनेक ५९ टक्के वापरकर्त्यांनी चॅटजीपीटीशी संबंधित तक्रारी केल्या आहेत.

काय आहे घिबली? 

चॅटजीपीटीमध्ये स्टुडिओ घिबली-शैलीतील (Ghibli) प्रतिमा निर्मितीच्या परिचयाने जगभरातील वापरकर्त्यांना मोहित केले आहे. ज्यामुळे त्यांना सामान्य फोटोंचे रूपांतर प्रतिष्ठित जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओपासून प्रेरित होऊन मोहक दृश्यांमध्ये करता आले आहे.

कसे वापराल हे फिचर?

चॅटजीपीटीवर यूजर त्यांचा आवडता फोटो अपलोड करून कनव्हर्ट दिस इमेज इन टू घिबली असे लिहिताच काही क्षणांतच घिबली शैलीतील छायाचित्रे मिळवता येतात. ‘एआय’द्वारे त्याचे रूपांतर जपानी ॲनिमेशनच्या क्लासिक घटकांत रूपांतरित केले जाते. त्यामुळे आठवणी या कलाकृतीचे रूप घेतात. हा ट्रेंड केवळ ओपन-एआयपुरता मर्यादित नाही, तर ग्रोक आणि जेमिनी या एआय प्लॅटफॉर्मनीही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -