Friday, October 31, 2025
Happy Diwali

Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral

Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral
बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मशिदीत स्फोट झाला. दोन माथेफिरुंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या. जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी स्फोट प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात मध्यरात्री तीनच्या सुमारास मशिदीमध्ये दोन जणांनी स्फोट घडवून आणण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्फोट प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात विजय गव्हाणेसह श्रीराम सागडे याला अटक केली आहे. 'शिस्तीत रहा बेट्या मी अंगार भंगार नाय रे', असं गाणं लावत आरोपीने रील बनवले. या व्हिडीओत आरोपीच्या हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट आहे. स्फोट प्रकरणातील विजय गव्हाणे या आरोपीने आगीशी खेळ केल्याचे रीलमध्ये दिसत आहे. आता हे रील व्हायरल होऊ लागले आहे.
Comments
Add Comment